पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : निव्वळ हौसेसाठी व परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी देशी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. हा तरुण सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पिस्टल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
दत्तवाडी पोलिसांनी या प्रकरणी मनिष प्रकाश घडशी (वय-२२, रा. अंबिल ओढा कॉलनी, पुणे) याला जेरबंद केले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ही कारवाई मंगळवारी (दि.५) सिंहगड रोडवरील भंडारी हॉटेल समोर करण्यात आली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, दत्ता मरगळे, अमीर पटेल व अमित सुर्वे यांना माहिती मिळाली की, एक तरुण देशी बनावटीचे पिस्टल सोबत घेऊन सिंहगड रोड , भंडारी हॉटले समोर थांबला आहे. पोलिसांनी भंडारी हॉटेल समोर सपाळा रचून आरोपी मनिष घडशी याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिस्टल आणि दोन काडतुसे आढळून आले. पोलिसांनी ३५ हजार ५०० रुपयांचे पिस्टल जप्त केले आहे.
ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परीमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड, सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, चंद्रकांत कामठे, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, दत्ता मरगळे, अमीर पाटेल, अमित सुर्वे, प्रकाश मरगजे, दयानंद तेलंगे, किशोर वळे, प्रशांत शिंदे, अमित चिव्हे, नवनाथ भोसले, प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, अनिस तांबोळी, हेमंत धायगुडे यांच्या पथकाने केली.







