जळगावात एकाच रात्रीत २ दुकाने फोडली; सीसीटीव्हीत चोरटे कैद

THIEF

जळगाव (क्राइम रिपोर्टर असलम खान) : शहरातील नवीपेठ, बी.जे मार्केट परिसरात चोरट्यांनी दोन दुकाने फोडल्याची घटना सोमवारी पहाचे उघडकीस आली. दरम्यान हा सगळा प्रकार सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीपेठेतील बालगंधर्व नाट्यगृह येथे असलेल्या प्रतीक एजन्सीमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. या एजन्सीत खाद्यतेल व बिस्कीटांची होलसेल विक्री होते. शनिवारी रात्री व्यवस्थापक प्रसन्न जैन यांनी एजन्सी बंद केली. रविवारी सुटी असल्यामुळे एजन्सी बंदच होती. याचवेळी चोरट्यांनी सोमवारी पहाटे चार वाजता कुलूप तोडून आत प्रवेश केला. ड्रावरमध्ये ठेवलेले १ लाख ५७ हजार ९६७ रुपयांची रोकड घेत पलायन केले.

यानंतर शेजारीच असलेल्या जुन्या बी. जे. मार्केटमधील सस्टेनेबल अॅग्रो कमर्शियल फायनान्स लि. या कंपनीच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या कंपनीतून रोकड, डीव्हीआर मधीन, राऊटर, एचपी स्विच, नेटवर्क कनेक्टर असे १३४ रुपयांवर डल्ला मारला आहे. या दोन्ही ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेरात हा सगळा प्रकार कैद झाला आहे. दुचाकी मुख्य रस्त्यावर उभी करुन त्यांनी एकेक करत दोन्ही दुकाने फोडली. या नंतर दोघे दुचाकीने निघुन गेले. दोन्ही चोरट्यांनी हाफ पॅन्ट व टीशर्ट घातलेले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here