बेरोजगारीला कंटाळून पती-पत्नीने ९ वर्षीय मुलीसह केली आत्महत्या

up-family-sucide

दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : बेरोजगारीला कंटाळून एका कुटुंबाने आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. सुसाईड नोटमधून हा भयंकर प्रकार समोर आला आहे. सोनू शर्मा या व्यक्तीने आपली पत्नी गीता शर्मा आणि मुलगी सृष्टी शर्मा यांच्यासह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लहान मुलाने आपल्या आत्याला हा घडलेला प्रकार सांगताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबच माहिती दिली असून सुसाईड नोटमध्ये असलेलं हस्ताक्षर आणि सोनूचं हस्ताक्षर यांचा तपास केला जात आहे. सोनू शर्मा आपली पत्नी आण मुलगी सृष्टी आणि एका मुलासोबत राहत होते. मंगळवारी रात्री पूर्ण परिवार एका खोलीत झोपले होते. सोनू यांचा मुलगा श्याम हा सकाळी सात वाजता खोलीतून बाहेर आला आणि बाहेर खेळू लागला.

वडिलांनी श्यामला शेजारी राहणाऱ्या आत्याकडून पीठ आणायला सांगितलं. तो जेव्हा घरी परत आला तेव्हा त्याला आई, बाबा आणि बहीण लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्याने तातडीने शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली. ज्यामध्ये तो गेल्या कित्येक दिवसांपासून बेरोजगार असल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here