यूएईला जाणारे जहाज अरबी समुद्रात बुडाले; तटरक्षक दलाने २२ जणांना वाचवले

boat-sink-in-arebian-sea

अहमदाबाद (गुजरात) : गुजरातच्या पोरबंदर किनार्‍याजवळ अरबी समुद्रात एक जहाज बुडाले. हे जहाज पोरबंदरहून यूएईला जात होते. जहाजावर २२ क्रू मेंबर्स होते, त्यांना वाचवण्यात यश आले आहे.

दरम्यान, भारतीय तटरक्षक दलाने जहाजावरील २२ क्रू मेंबर्सची सुटका केली आहे.

आयसीजीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय तटरक्षक दल पोरबंदर किनार्‍याजवळ अरबी समुद्रात बचाव कार्य करत आहे. समुद्राच्या लाटांचा तडाखा बसल्याने एमटी ग्लोबल किंगकडून संकटाचा इशारा देण्यात आला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here