दिवसा जीम ट्रेनर तर रात्री अट्टल चोर; मानकापूर पोलिसांनी केला जेरबंद

gym-trainer-arrested
file photo

नागपूर (उपसंपादक उमेश अबनलकर) : शहरातील मानकापूर पोलिसांनी एका जीम ट्रेनरला चोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. इम्रान खान हमीद खान (वय ३२) हा दिवसभर जीममध्ये आलेल्या लोकांना जीम ट्रेनिंग द्यायचा त्यानंतर रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन घरफोड्या करत होता.

मानकापूर पोलिसांनी चोरीच्या प्रकरणाचा तपास करताना आरोपी जीम ट्रेनरसह एकूण ४ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात एका सराफा व्यावसायिकाला अटक केली असून त्यांच्याकडून २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे मो. फैजान हे संपूर्ण कुटुंबासह भोपाळला गेले होते. घरी कुणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन आरोपींनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील १७ लाखांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणाची तक्रार दाखल होताच मानकापूर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला. चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींची खात्री पटताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मो. फैजान यांच्या घरासह आणखी काही घरी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये जीम ट्रेनर इम्रान खान, चिकन विक्रेता अफसर खान आणि प्लास्टिकच्या वस्तू विकणाऱ्या नौशादला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here