कंगनाने शेअर केला ‘इमर्जन्सी’चा फर्स्ट लूक…

emergency-movie

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : कंगना राणौतचा चित्रपट इमर्जन्सी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा धाकड हा emergency-movieचित्रपट फ्लॉप होताच कंगनाने या चित्रपटाची तयारी सुरू केली.आता तिने तिचा फर्स्ट लुक उघड केला आहे. यूट्यूबवर १.२१सेकंदाच्या फर्स्ट लूकमध्ये कंगना रणौत इंदिरा गांधींच्या गेटअपमध्ये डायलॉग बोलताना दिसत आहे. सोशल मीडियावर या लूकचे खूप कौतुक होत आहे.

टीझरची सुरुवात फोन कॉलने होते. कंगना मागून दाखवली आहे. एका व्यक्तीने कंगनाला विचारले, जेव्हा प्रेसिडेंट निक्सन फोन लाइनवर येतात तेव्हा ते तुम्हाला मॅडम म्हणून संबोधू शकतात का? यावर कंगना उत्तर देते, ठीक आहे, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना एक मिनिटासाठी सांगा की माझ्या ऑफिसमधील प्रत्येक जण सर म्हणतात, मॅडम नाही.

कंगनाच्या या लूकचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. कंगनाने सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल अनेकदा लिखाण केले आहे. तिने लिहिले की, मी एक वर्षापासून यावर काम करत आहे. आता असे वाटते की या चित्रपटासाठी माझ्यापेक्षा चांगला दिग्दर्शक कोणीच असू शकत नाही.

पूर्वीच्या तुलनेत हा लूक खरोखरच खात्रीलायक आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. चित्रपट हा राजकीय विषयावरील आहे. यामध्ये कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आहे. चित्रपटात आणीबाणीचा काळ दाखवण्यात आला आहे.

कंगनाने इमर्जन्सी या चित्रपटाच्या लूक टेस्टचा फोटो शेअर केला तेव्हा सोशल मिडीयावर तिला ट्रोल करण्यात आले होते. . तिचा लूक परफेक्ट व्हावा यासाठी तिने ऑस्कर विजेते मेकअप आर्टिस्ट डेव्हिड मालिनॉस्कीची यांना बोलावल्याचे सांगण्यात येत आहे. कंगना राणौत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. मणिकर्णिका नंतर त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा दुसरा चित्रपट आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here