किक बॉक्सिंग सामन्यादरम्यान २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू : Video

nikhil-suresh-dead-during-kicboxing-match

बंगळुरु : येथे सुरु असलेल्या किक बॉक्सिंग चॅम्पिअनशिपमधील फाईट सुरु असतांना २३ वर्षांच्या निखिल सुरेश या किकबॉक्सरचा जीव गेला. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून, या किकबॉक्सरच्या मृत्यूमुळे क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी स्पर्धकाने मारलेल्या एका पंचने निखिल जागच्या जागी कोसळला. त्यानंतर त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आलं. तिथे निखिलची नाजूक प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं. पण कोणत्याच उपचाराना निखिल प्रतिसाद देत नव्हता. अखेर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

पाहा व्हिडीओ :

निखिलच्या मृत्यूबद्दल कळल्यानंतर स्पर्धेतील आयोजकांसह क्रीडारसिकांना मोठा धक्का बसला. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. निखिलच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी किक बॉक्सिंग चॅम्पिअनशिपचं आयोजन करणाऱ्या आयोजकांवर आरोप केले असून, त्यांच्या हलगर्जीपणामुळे निखिलचा जीव गेला, असा आरोपही केला आहे. पोलिसांनीही याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेत पुढील तपास सुरु केलाय.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here