जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : जिल्ह्यातील अमळनेर डेपोच्या बसला मध्यप्रदेशच्या धारमध्ये मोठा अपघात झाला आहे. इंदूरहून अमळनेरकडे येणारी बस नदीत कोसळली. या बसमध्ये ४० प्रवासी होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
12 people dead, 15 rescued after a Maharashtra Roadways bus going from Indore to Pune falls off Khalghat Sanjay Setu in Dhar district, says Madhya Pradesh minister Narottam Mishra. pic.twitter.com/h4FuW2B3Ch
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) July 18, 2022
या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, अमळनेर डेपोची अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा आहे. अमळनेर डेपोची एमएच ४० एन९८४८ क्रमांकाची बस ही इंदूर येथे गेली होती. तेथून रिटर्न प्रवासात खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्या कलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात ही बस रात्री कोसळली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जणांना वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली.
प्राथमिक माहितीनुसार, नदीतील पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत ९ जणांचे मृतदेह वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. नदीतील खोल पाण्यात बस बुडाली आहे.नदीतून बस काढण्यासाठी सर्व यंत्रणा आणण्यात आली आहे, अशी माहितीही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, एसडीआरएफ पथक आणि स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य आणि मदतकार्य सुरू केले आहे. इंदूर आणि धारहून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, बचावकार्याचा आढावा घेत आहेत.

Video:
https://www.facebook.com/BulandPoliceTimes/videos/424986922890053/







