मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : दिनांक :- १६ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक व पालक आ.विनायकराव मेटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, आ.प्रवीण दरेकर, आ.बबनराव पाचपुते, आ.रत्नाकर गुट्टे ,डॉ.आ.भारतीताई लवेकर, आ. भीमरावजी केराम यांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात साजरा झाला.
चाहत्यांचा उस्फुर्त प्रतिसाद,साहेबांवर मनापासून प्रेम करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले शिवसंग्रामचे कार्यकर्ते, महाराष्ट्र तसेच देश पातळीवरील सन्माननीय मान्यवर पदाधिकारी यांच्या अत्यंत शिस्तबद्ध नियोजनात कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांचे मर्मभेदी भाषण चिमटे काढत तडाखेबंद झाले. त्यांनी भाषणात सांगितलेली खारूताईची गोस्ट उपस्थित सर्वांच्या मनाला भावली.
कलाकार तंत्रज्ञ यांच्या समस्या काय आहेत याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसंग्रामचे संस्थापक आमदार विनायकराव मेटे यांच्यातर्फे देण्यात आले याप्रसंगी कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते मुंबई एकीचे शिलेदार ही यावेळी उपस्थित होते शिवसंग्राम चित्रपट सांस्कृतिक विभागाचे अध्यक्षांनी कलाकार व तंत्रज्ञांच्या समस्य सरकारपुढे मांडल्या.







