मालाडमधील मुड आणि काका बार पुन्हा सुरू

mood-dance-bar-and-kaka-dance-bar

ऑर्केस्ट्रा परवाना रद्द केल्याच्या पोलीस आयुक्तांच्या निर्णयास उच्च न्यायालयाची स्थगिती

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : मुंबई शहर उपनगरामधील मालाड पश्चिम, येथील एस. व्ही. रोडवरील मुड बार तसेच काका बार या दोन बार बाबत मुंबई पोलीस आयुक्त यांनी ऑर्केस्ट्रा परवाना रद्द करण्याबाबत दिलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिल्याने दोन्ही हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळालेला आहे. खबरी लोकांच्या खबरी वरून पोलिसांनी धाडी टाकून गुन्हे नोंद करून ऑर्केस्ट्रा धारक नियमभंग करीत असल्याचा आरोप करून कारणे दाखवा नोटीस बजावली तसेच जून महिन्यामध्ये या दोन्ही ऑर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द केले होते. या निर्णयास दोन्ही बार चालक यांनी ॲड. जीवनदत्त आरगडे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालय येथे याचिका दाखल केली या याचिकेच्या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांच्या निर्णयास स्थगिती दिली आहे.

 

पैशाची उधळण करणे , महिलांचे असभ्य नृत्ये करणे , तसेच अन्य इतर नियमभंग केल्याच्या आरोपावरून कारणे दाखवा नोटीस देऊन अंतिम सुनावणी अंती मुंबई पोलीस आयुक्त यांनी दोन्ही बारचे परवाने रद्द केले होते. फक्त गुन्हे दाखल असणे म्हणजे नियमभंग असू शकतं नाही , नोंद केलेल्या गुन्ह्यातील दोष सिद्धी झालेले नाही त्यामुळे गुन्ह्यातील आरोप न्यायप्रविष्ठ असताना निवडापूर्व निष्कर्ष काढता येणार नाहीत अशा आशयाचे अपील महाराष्ट्र शासन गृह विभाग मंत्रालय येथे प्रलंबित असल्याने मालाड येथील मुड आणि काका या दोन्ही नामांकित हॉटेल चालकांनी ॲड. जीवनदत्त आरगडे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करून धाव घेतली होती. सदर याचीकेमध्ये उच्च न्यायालयाने हॉटेल चालक याना पोलीस आयुक्तांच्या निर्णयास स्थगिती देऊन मोठा दिलासा दिलेला आहे.

 

वारंवार होणाऱ्या कारवायामुळे व्यवसायाची घडी विस्कटते त्यामुळे हॉटेल बार लीगल सेलची स्थापना
कार्यवाहीचा नावाखाली होत असलेल्या अडथळे यामुळे आर्थिक संकटांचा सामना हॉटेल व्यावसायिक याना करावा लागतो पोलिसांशी वैर करून व्यवसाय करता येत नसला तरी हॉटेल चालकांच्या बाबतीत पोलिसांची व्यवसाय स्नेही भूमिका दिसून येत नसल्याने कित्येक हॉटेल चालक आर्थिक नुकसानीत जाऊन व्यवसाय बंद केलेला आहे. वारंवार होत कारवाया आणि कायदेशीर अडथळे यांचा गंभीर परिणाम होत असल्याने कायदेशीर लढ्यासाठी ॲड जीवनदत्त आरगडे यांच्या सहभागाने हॉटेल बार मालक यांनी स्वतंत्र हॉटेल बार लिगल सेल स्थापन करण्यात आला आहे.

 

या माध्यमातून हॉटेल बार व्यावसायिक शासन प्रशासन आणि न्यायालय यांच्यासमोर आपली न्याय्य हक्कांची भूमिका नम्रपणे मांडणार आहेत. हॉटेल बार लीगल सेल सदस्य होण्यासाठी हॉटेल चालकांनी 09545152888, 09699520711, या क्रमांकावर संपर्क करून सदस्त्त्व नोंदणी करावी अशी विनंती सेलच्या वतीने करण्यात आली आहे. हॉटेल बार याना कायदेशीर कार्यवाही च्या नावाखाली होत असलेला त्रास वारंवार खोटे नोंदले जाणारे गुन्हे आणि कार्यवाहीचा फार्स यासाठी संघटितपणे न्यायालयीन लढाई लढणे गरजेचे आहे.

 

मानसिक तणाव मुक्तीसाठी ऑर्केस्ट्रा बार एक वरदानच –
मानसिक शारीरिक ताण तणावाच्या जीवनात शारीरिक आरोग्यासाठी उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दवाखाने उपलब्ध आहेत मात्र मानसिक आरोग्यासाठी मानसिक तनाव मुक्तीसाठी मनःशांती आणि मानसिक आरोग्य यासाठी प्रत्येकाला थेट मनोचिकित्सा करणे हे वैचित्र्यपूर्ण आणि कृत्रिम वाटते. त्यासाठी म्युझिक थेरपी आणि विविध आकर्षक रंग रस यामध्ये लुप्त होऊन कित्येक वैफल्यग्रस्त लोक मानसिक आजारातून वैफल्यातून नैराश्यातून बाहेर पडली आहेत जीवनातील एकाकीपणा नैराश्य दुखः चिंता वैफल्य असे सगळे दुःख मित्रांच्या सोबत गाणी ऐकून विरंगुळा करून दूर करण्यासाठी रस आणि रंग शोधण्यासाठी चाचपडत असलेल्या नागरिकांनी स्वयं स्फुर्तीने ऑर्केस्ट्रा आणि वाद्यवृंद असलेल्या बार मध्ये विरंगुळा करताना समाधानी होऊन मानसिक दृष्ट्या स्वस्थ झाल्याची उदाहरणे आहेत असे काही सामाजिक सर्वेक्षणामध्ये निरीक्षणात आलेले आहे. त्यामुळे इंद्र दरबारात सुद्धा देवदेवता करीत असलेली नृत्ये आणि नृत्यांगना हे पृथ्वीवर मुंबई पोलिसांनी प्रतिबंध केला आहे मात्र संगीत आणि रंगीत उपचार म्हणून शौकीन लोक ऑर्केस्ट्रा बार मध्ये विरंगुळा करताना दिसतात.कायदा सुव्यवस्था भंग होत नसताना सुद्धा रेडच्या नावाखाली आजपर्यंत नोंदले गेलेले गुन्हे यामध्ये अंतिम दोष सिद्धीचे अत्यल्प प्रमाण यावरून खोट्या कारवाया केल्या जात आहेत असेच सार्वत्रिक निष्कर्ष निघत आहेत.

 

पूर्वी डान्स बार मध्ये नृत्यास बंधने नव्हती तसेच वेळेची बंधने शिथील होती मात्र सद्य स्थितीत कडक निर्बंध आणि वाढलेले परवानाधारक यांच्यामुळे या क्षेत्रात असलेला चंगळवाद संपला असून आता ऑर्केस्ट्रा बार हे फक्त मानसिक उपचारासाठी विरंगुळा केंद्र म्हणूनच उरली आहेत.त्यामध्येही मोठी स्पर्धा आणि त्यात पोलीस कार्यवाहीचा होत असलेला अवाजवी हस्तक्षेप हा कायदेशीर आणि व्यावसायिक अडथळे निर्माण करणार आहे म्हणून स्वतंत्र लीगल सेल च्या माध्यमातून सामूहिक कायदेशीर लढा देण्यासाठी हॉटेल चालक यांनी पुढाकार घेतला आहे ॲड. आरगडे यांनी सांगितले.

High court pettion

bombay high court

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here