शिवसेनेच्या कल्याण पूर्व उपशहरप्रमुखावर प्राणघातक हल्ला

harshvardhan-palande-kalyan-shivsena

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : कल्याण पूर्वचे शिवसेनेचे उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर दुपारी १२.३० च्या सुमारास चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.

 

हल्ला करताना काठ्या आणि शस्त्रांचा वापर करण्यात आला. हल्ल्यात पालांडे यात जखमी झाले आहेत. शिंदे गटात असलेले माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी त्यांच्या माणसांकडून हा हल्ला केल्याचा आरोप पालांडे यांनी केला आहे. गायकवाड यांनी हे आरोप फेटाळून लावत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

 

पालांडे यांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून त्यांना हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पूर्वेतील विजयनगर परिसरातील संतोषी माता मंदिरासमोर ही घटना घडली. या घटनेप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here