औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : पोलीस असल्याची बतावणी करत महिलेच्या अंगावरील दागिने काढून ठेवायला सांगत हातचालाखिने १ लाख ९५ हजार रुपयांचे दागिने तीन अज्ञात चोरट्यांनी पळवले. या प्रकरणी पोलीसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
वेदावती समीर नटवे यांनी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात या चोरी प्रकरणी दिलेल्या तक्रारीत सांगितले की, दिनांक १७ जुलै रोजी दुपारी त्या पावणे एक वाजण्याच्या सुमारास भाजीपाला घेण्यासाठी राजीव गांधी चौकाकडे चालत जात होत्या. बांधकाम भवनच्या गेटजवळ एकजण त्यांच्याजवळ आला. मावशी तुमच्याकडचे सोन्याचे दागिने काढून घ्या अन्यथा साहेब तुम्हाला दंड करतील. इथ मोठी चोरी झालेली आहे,
आम्ही पोलीस आहोत असे सांगून त्यांच्या जवळील ६० ग्रॅम वजनाच्या दोन पाटल्या आणि ३० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन असा सुमारे १ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज कागदात बांधून त्यांच्या हातात दिला. परंतु, हातचालाखीने हे दागिने लांबवले आणि कागदात केवळ एक स्टीलचा, लोखंडी कडा, आणि बनावट पिवळ्या रंगाची बांगडी बांधून दिली. अज्ञात व्यक्तीविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.







