आढळराव पाटलांना हातपाय तोडण्याची धमकी देणाऱ्या १५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

Shivajirao-Adhalrao-Patil

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. शिवसैनिकांनी आढळराव यांच्याविरोधात आंदोलनही केलं. आंदोलना दरम्यान, काही शिवसैनिकांनी आढळराव पाटलांचे हातपाय तोडण्याची धमकीही दिली. त्यामुळे त्यांच्यावर राजगुरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 

आंदोलनप्रसंगी आक्रमक शिवसैनिकांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गद्दार असं लिहीत निषेध व्यक्त केला. तसंच आम्ही यापुढेही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचंही या शिवसैनिकांनी म्हटलं आहे. यावेळी शिवसैनिकांकडून आढळराव पाटलांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

 

शिवसैनिकांनी आढळराव पाटील यांची बदनामी होईल असे कृत्य केले. त्यांना अश्लिल भाषेत शिवीगाऴ करुन लांडेवाडी येथील घरी येऊन हात पाय तोडण्याची धमकी दिली. अशी तक्रार अंकुश शेवाळ यांनी पोलिसांत दिली. त्यांच्या तक्रारीवरून राजगुरुनगर पोलिसांनी माजी जिल्हाप्रमुख राम गावडे माजी तालुकाध्यक्ष गणेश सांडभोर यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here