कॉन्ट्रॅक्टरकडे खंडणी मागणारा माहिती अधिकार कार्यकर्ता जेरबंद

arrested

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी कंपनीने सर्व कायदेशीर परवानग्या घेतल्या आहेत का, अशी विचारणा करून कंपनीला व्यवस्थीत काम करावयाचे असेल व दंडात्मक कारवाई होऊ द्यायची नसेल तर दोन कोटी रुपये द्या. अन्यथा माहिती अधिकारात माहीती घेऊन कंपनीविरोधात हायकोर्टात दावा दाखल करू अशी कॉन्ट्रॅक्टरला धमकी देऊन खंडणी स्वीकारणाऱ्या दत्तात्रय गुलाबराव फाळके (वय – ४६, रा. धनकवडी) या माहिती अधिकार कार्यकर्त्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फाळके (वय ३०) हा धनकवडी येथे राहण्यास आहे. तर, तक्रारदार यांच्या कंपनीकडून नगर जिल्ह्यातील आढळगाव येथे महामार्गाचे काम सुरू आहे. याबाबत फाळके हा तक्रारदारांना सातत्याने भेटून महामार्गाच्या कामाबाबत परवानग्या घेतल्याबाबत विचारणा करीत होता. तसेच, महामार्गाचे काम व्यवस्थीत करायचे असल्यास व तुमच्या कामावर दंडात्मक कारवाई टाळायची असेल तर दोन कोटी रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास कंपनीच्या कामाबाबत माहिती अधिकारात माहिती घेऊन कोर्टात दावा दाखल करण्यासह तुमच्या कंपनीस राष्ट्रीय महामार्गाचे काम करून देणार नाही, तुम्हालाही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन खंडणी मागितली.

 

याबाबत तक्रारदाराने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. त्यानूसार गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने भारती विद्यापीठ परिपसरात सापळा रचला. बंडलवर दोन हजारांची नोट ठेवून बाकी 1246 डमी नोटांचे 2 बंडल असे 25 लाख रुपयांचे बंडल देण्यासाठी तयार करण्यात आले. मंगळवारी दुपारी फाळके हा खंडणी घेण्यासाठी आला असता त्याला पोलिसांच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

 

अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चांगदेव सजगणे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, अंमलदार शैलेश सुर्वे, संग्राम शिनगारे, सचिन अहीवळे, अमोल पिलाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here