नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : येथील सीवूड सेक्टर ४८ मध्ये गुरुकृपा सोसायटीमधील इमारतीचा स्लॅब पहाटे चार वाजता कोसळल्याने, घडलेल्या या घटनेत एक रहिवासी जखमी झाला आहे.
सीवूड सेक्टर ४८ मध्ये गुरुकृपा सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये राहणारे संजय पवार पहाटे गाढ झोपेत असताना त्यांच्या फ्लॅटमधील चाळीस टक्के स्लॅब कोसळल्याने जखमी झाले आहेत.
त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या कानास आठ टाके पडले आहेत. या घटनेमुळे सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या इमारतींचा पुनर्विकास करावा अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.







