ठाणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रकाश कदम) : आज (दि.२३) ठाणे वाहतूक शाखेने तीन हात नाका उड्डाणपुलाच्या खाली अनोखी योजना राबवत हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांना गुलाबपुष्प व हेल्मेट देण्यात आले.
यावेळी दत्तात्रय कराळे पो.सह आयुक्त,ठाणे शहर, संजय जाधव,अपर पो.आयुक्त प्रशासन, दत्तात्रय कांबळे,पो.उप आयुक्त वाहतूक शाखा,पो.उप आयुक्त परिमंडळ-१,परिमंडळ-५ यांच्या उपस्थितीत तीन हात नाका उड्डाण पुलाच्या खाली विना हेल्मेट दुचाकी स्वारांना गुलाबाचे फुल आणि हेल्मेट देण्यात आले.







