ठाणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रकाश कदम) : ठाण्यातील कोठारी कंपाऊंड येथील अनधिकृत हुक्का पार्लर,पब MH ०४ वर ठाणे महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे.
ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे समन्वयक महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्तक नगर प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी श्रद्धेश सुरेश मोहिते, विहार अशोक पायमोडे, सोहम विजय जोशी, स्वप्नील सुरेश ठोसर या ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.







