जळगाव शहरात कोरोनाबाधितांची संख्या चार हजारापेक्षा जास्त

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणी अहवाल आज (दि.१३) प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाने सलग चौथ्या दिवशी पाचशेचा आकडा पार केला आहे. आज ५७४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, सर्वाधिक १६८ रुग्ण जळगाव शहरात आढळून आले, त्यामुळे जळगाव शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्ये चार हजारांचा टप्पा पार केला असून, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६ हजार ५३६ झाली आहे. दिवसभरात ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ३४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आज आढळलेल्या ५७४ रूग्णांमध्ये जळगाव शहर १६८, जळगाव ग्रामीण २६, भुसावळ २२, अमळनेर ८९, चोपडा ६४, पाचोरा २५, भडगाव ९, धरणगाव ३२, यावल २३, एरंडोल ४, जामनेर ३१, रावेर १४, पारोळा ३९, चाळीसगाव २१, मुक्ताईनगर ३, बोदवड १ व इतर जिल्ह्यातील ४ असा समावेश आहे. दिवसभरात ११ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर आणि भडगाव , यावल तालुक्यातील प्रत्येक २ तर चोपडा, रावेर, एरंडोल, जळगाव , जामनेर तालुक्यातील प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here