अवैध दारू बंद करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल -उषाताई वाघ

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव तालुक्यातील आनोरे येथे अवैध दारू विक्री होत असून त्या संदर्भात धरणगाव शिवसेना महिला आघाडी तर्फे धरणगाव पोलीस निरीक्षक पवन देसले यांना निवेदन देण्यात आले निवेदनात आनोरे येथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत आहे यामुळे दारू पिऊन घरातील माणसे घरात भांडण होत आहे या भडणामुळे आम्ही महिला वर्ग त्रस्त होत असल्याने आम्हाला मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहेत यामुळेच आमचा संसारात बाधा निर्माण होत आहे तसेच या अवैध दारू मुळें तरुण वर्ग ही व्यसनाधीन होत आहे तरी तात्काळ कारवाई करण्यात यावी नाहीतर शिवसेना स्टाईल अदोलन करण्यात येईल असा इशारा धरणगाव चे माजी नगराध्यक्ष तथा महात्मा फुले बिग्रेड चे जिल्हा अध्यक्ष उषाताई वाघ यांनी दिला.
महात्मा फुले ब्रिगेड चा महिला जिल्हाध्यक्ष उषाताई गुलाबराव वाघ तसेच शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख कल्पना कापडंने यांचा नेतृत्वाखाली आनोरे येथिल महिला एकत्र येऊन पोलिस निरीक्षक देसले साहेब यांचा कडे दारूबंदी करा असा एल्गार पुकारत आंदोलनचा इशारा देण्यात आला. यावेळी उपस्थित उपनगराध्यक्ष कल्पना महाजन, नगरसेविका अंजली विसावे, शहर प्रमुख रत्ना धनगर, भारती हेमंत चौधरी, हेमांगी अग्निहोत्री, सुनीता प्रल्हाद चौधरी, कांचन कापनडे, पुष्पा पाटील, छाया पाटील, मीना पाटील, सरला पाटील, सुरेखा पाटील, चंदन बाई पाटील, आशा पाटील, सरला महाजन, तिरोना बाई पाटील, मंगल बाई पाटील, आशा समाधान पाटील, ममता महाजन , जिजाबाई कापनडे, भिकुबई महाजन, विजया पाटील, सुमित्रा पाटील, रेखा मोरे, सुनंदा पाटील, कल्पना महाजन, मिनाबाई भोई , विमल महाजन, या महिला निवेदन देण्यासाठी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here