पी-४ फाउंडेशन या संस्थेच्या “मुख्य समन्वयक” पदी (अध्यक्ष) सचिन मोरे

पुणे (प्रतिनिधी पंढरी गायकवाड) – पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्रॅम महाराष्ट्र राज्य या उपक्रमातील पी-४ फाउंडेशन संस्थेच्या मुख्य समन्वयकपदी (अध्यक्ष) सचिन मोरे भारत शिल्ड फोर्स प्रा. ली चे मालक यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
पुण्यामध्ये महाराष्ट्र खाजगी सुरक्षा संस्थांच्या केंद्रीय कार्यकारणी निवड प्रक्रिया झाली. महाराष्ट्रातील सर्वांत मोठी खाजगी सुरक्षा रक्षक सेवा पुरवठादार संस्था समजली जाणारी पी-४ फाउंडेशन हे एक मानांकित मोठे एन.जी.ओ. आहे. महाराष्ट्र पोलीस प्रशासनासोबत पब्लिक पार्टिसिपेशन म्हणून कामकाज व कर्तव्य करते (पोलीस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्रॅम महाराष्ट्र राज्य) यांच्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजरोहण व कार्यकारणी निवड कार्यक्रम पुण्यात पार पडला.
नव्याने निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्ष : सचिन मोरे (भारत शिल्ड फोर्स प्रा. ली.), उपाध्यक्ष : संभाजी बुचडे (एस एम ग्रुप), उपाध्यक्ष : मनेश घुले (ईगल आय गार्डस अँड बाउन्सर), मुख्य संघटक : कुशल लोणकर (थर्ड आय सिक्युरिटी & बाउन्सर सर्व्हिसेस), मुख्य संघटक : प्रमोद होले (कॉर्डन सिक्युरिटी अँड अलाईड सर्व्हिसेस प्रा. ली) , सचिव : सुवर्णा चाकोरकर (तनिष एन्टरप्रायझेस) , सह सचिव : सोमनाथ गायकवाड (जी.१.एस सिक्युर सोल्युशन प्रा. ली.), अतिरिक्त सचिव : संभाजी उकिरडे (चिराग इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस) , कोषाध्यक्ष : ज्ञानेश्वर चोरघे (फिनिक्स सिक्युरिटी एन्ड फॅसिलिटीस सर्व्हिसेस), सह कोषाध्यक्ष : विष्णू जाधव (परफेक्ट सर्व्हिसेस प्रोप्रटी सोल्युशन), मुख्य कार्यकारणी समन्वयक : राजेंद्र राठोड (रिलायबल एच आर फॅसिलिटी प्रा.ली.) , कार्यकारणी समन्वयक : किंमतीलाल शर्मा (जे के एन्टरप्रायझेस), सह कार्यकारणी समन्वयक : प्रकाश जाधव (सेवेन फोर्से डिटेक्टीव & सिक्युरिटी सर्व्हिसेस), सह कार्यकारणी समन्वयक : प्रविण ढोकले (स्कॉर्पिअन टास्क फोर्स प्रा. लि.), व्यवस्थापकीय समिती उपाध्यक्ष : शरद काळे (एस के सर्व्हिसेस),अविनाश जगताप (स्टार सिक्युरिटी),तानाजी भोसले (भोसले ग्रुप),…इ मान्यवरांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here