मुंबई (उपसंपादक वीरेंद्र त्रिपाठी) – फेम इंडिया – एशिया पोस्ट या प्रसिद्ध नियतकालिकातर्फे करण्यात आलेल्या 50 उम्दा विधायक सर्व्हे 2020 अर्थात देशातील 50 उत्कृष्ट आमदारांचा विविध श्रेणीत केलेल्या सर्व्हेत वर्सोवा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ . भारतीताई लव्हेकर यांची दूरदर्शी आमदार या श्रेणीत निवड करण्यात आली आहे.
फेम इंडिया तर्फे देशातील प्रेरक आमदार म्हणून झालेली त्यांची निवड त्यांच्यातील कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी चा गौरव करणारी आहे. आमदार डॉ. भारती ताई लव्हेकर यांना २०१८ मध्ये मा. राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते फर्स्ट लेडी अवॊर्ड देऊन सन्मानित करण्यात आले होते.
आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांच्या सह राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रेरक आमदार या श्रेणीत आ. आशिष शेलार यांची उत्कृष्ट, आ. देवयानी फरांदे यांची भविष्यवादी या श्रेणीत निवड करण्यात आली आहे.







