जळगाव मनपा व धर्मरथ फाऊंडेशनतर्फे कोरोना तपासणी शिबिर

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – शहर महानगरपालिका आयोजित व धर्मरथ फाउंडेशन या बहुउद्देशीय संस्थे यांच्या सहकार्याने ‘कोरोना’संशयित लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे.तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती धर्मरथ फाउंडेशन तर्फे करण्यात आली आहे.
दिनांक-12/8/2020 रोजी पासून दररोज सुरू राहणाऱ्या या शिबिराची वेळ सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी 2.वाजेपर्यंत असून, शिबिराचे स्थळ डी.बी.जैन मनपा रुग्णालय,शिवाजी नगर,जळगाव आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःसाठीच नाही तर आपल्या परिवार व परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी कोरोना आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन धर्मरथ फाउंडेशनचे संस्थापक विनायक पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here