नदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यात गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला परंतु धडगांव सारख्या अतिदुर्गम भागात नेटवर्कची समस्या असल्याने ऑनलाईन शिक्षण घेण्यास मोठी अडचण निर्माण होत असुन तालुक्यातील अनेक गावांत तरुणांनी पुढाकार घेतला आहे. आपआपल्या गावांत गट शाळा सुरू केल्या असून मागील अनेक दिवसापासून विद्यादान देत आहेत.
या तरुणांना प्रोत्साहन देण्याकरीता अनेक सामाजिक संघटना, संस्था देखील पुढे येत आहेत… त्यात मौजे उमराणी बु गावातील तरुण दिलीप पावरा, चेतन पावरा या दोन तरुणांनी पुढाकार घेत गरीब वंचित विध्यार्थ्यांना रोज सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत मोफत शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व अभ्यासात खंड पडू नये या उद्देशाने शिक्षण देत आहेत.
यावेळी गावातील शारदाई फॉउंन्डेशन उमराणी बु व हुडल फॉउंन्डेशन रोषमाळ भेट देण्यात आली….यावेळी सतत गरीब वंचित विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पासुन वंचित राहू नये तसेच विविध उपक्रमाच्या माध्यमातून गावस्तरावरील जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना प्रोत्साहन तसेच शिक्षणात गोडी निर्माण व्हावी म्हणुन विध्यार्थ्यांना निःस्वार्थपणे शैक्षणिक साहित्य वाटप करणारी फॉउंन्डेशनने व हूडल फॉउंन्डेशनच्या अध्यक्ष बापु पावरा यांचा वाढदिवसानिमित्त संयुक्त विद्यमानाने शैक्षणिक साहित्य व चॉकलेट वाटप करण्यात आले.आणि मोफत शिक्षण देणाऱ्या तरुणांना कौतुकास्पद कार्य करत आहे म्हणुन सन्मान करण्यात आले…. तसेच तालुक्यातील युवा तरुणांनी गरीब विध्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहेत त्यांना सुचित करण्यात येत आहे कि शारदाई फॉउंन्डेशन उमराणी बु यांच्याकडून तालुक्यातील प्रत्येक गावातील तरुणांनी पुढाकार घेत आपल्या गावातील, पाडातील मुलाना शिकवण्याचे उत्तम कार्य करत आहे त्यांना शारदाई फॉउंन्डेशन कडून शैक्षणिक साहित्य पुरवठा करण्यात येईल, शैक्षणिक साहित्यासाठी संपर्क करण्यात यावा असे शारदाई फॉउंन्डेशनचे अध्यक्ष जगदिश पावरा यांनी म्हटले आहे.








