उपविभागीय अधिकारी, वर्धा यांचेशी सकारात्मक चर्चा
नागपुर (प्रतिनिधी मनोज बाचले) – गेल्या एक महिन्यापासून सारी सर्वेक्षणाकरिता मोठ्या संख्येने शिक्षकांना जुंपण्यात आलेले आहे. मात्र हे सर्वेक्षण करीत असताना शिक्षकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महत्वाचे म्हणजे या शिक्षकांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा साधने प्रदान करण्यात आलेली नसल्याने, या सर्वेक्षणातील एक शिक्षक कोरोनाबाधित झाला.त्यामुळे शिक्षकांचा असंतोष लक्षात घेता आज दिनांक 13 आॅगस्ट 2020 रोजी अजय भोयर यांचे नेतृत्वात उपविभागीय अधिकारी, श्री.बगळे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली.
यावेळी मुख्याधिकारी, न प वर्धा यांचे निलंबनाबाबतचे आदेश मागे घेणे, पल्स ऑक्सीमिटर व्दारे नागरीकांची तपासणी करणे (कारण हे आरोग्य विभागाचे काम आहे), विमा कवच लागू करने, शिक्षकांना सर्वॅक्षणातुन मुक्त करण्याबाबत जिल्हाधिकारी, वर्धा यांचेशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यावर चर्चा करून, तात्काळ याबाबत निर्णय न घेतल्यास शिक्षक सर्वॅक्षणावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, तक्रार निवारण समितीचे पुंडलिक नागतोडे, संजय बारी, कुंडलिक राठो, सुनिल गायकवा, संतोष महाजन, अजय सावरकर, अमोल वाशिमकर, पल्लवी वखरे, राधा दुबे, ए.के.सोनकुसरे, एस.एस.वरभे, प्रभाकर ऊईके, अविनाश धात्रक, डी.जी.मडावी, परमेश्वर केंद्रे, एम.डी.मून, एच.पी.माटे, एन.पी.खराबे, एस.डी.मसराम या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.








