ऑनलाईन शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना साहित्य देण्याची आरपीआय (आ)ची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी नियाज जमादार) – महाराष्ट्र शासनाने सध्या शिक्षण online पद्धतीने सूरु केले आहे पण त्याचा फटका ग्रामीण भागातील व दुर्गंम भागातील तसेच गरीब विद्यार्थ्यांना बसत आहे.त्यामूळे या विद्यार्थ्यांना online साठी लागणारे साहित्य पुरविण्याठी रिपब्लिकन पार्टि आँफ इंडिया (आ) कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने प.महा.अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे सर व जिल्हाअध्यक्ष उत्तम कांबळे(दादा) यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाअधिकारी भाऊसाहे गलांडे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
सध्या देशात तसेच आपल्या महाराष्ट्रात कोरोना या साथीच्या रोगाने धुमाकूळ घातला आहे.त्याचा फटका सर्वच व्यवस्थेला बसला आहे ही वस्तूस्थीती नाकारता येत नाही.अशा प्रसंगी 2020 पासून लाँकडाऊन मूळे सर्वच शाळा,काँलेज बंद आहेत.त्यामूळे विद्यार्थ्यांचे बरेच नुकसान होत आहे अशा परीस्थीतीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अध्ययन,अध्यापन चालू रहावे म्हणून महाराष्ट्र शासनाकडून लर्नींग फाँर्म होम ही संकल्पना राबविली जात आहे.हा उपक्रम चांगलाच आहे.पण या ई-लर्नीग व्दारे अध्ययन,अध्यापना पासून बरेच गरीब विद्यार्थी वंचित आहेत.कारण या विद्यार्थ्यांच्याकडे अध्ययन,अध्यापन करण्यासाठी लँपटाँप,काँप्यूटर,अँनडाँईल मोबाईल सारख्या वस्तू नाहीत.तसेच दुर्गम भागात नेटवर्क कव्हरेजची हि तक्रार आहे.त्यामूळे बहुसंख्य विद्यार्थी या online शिक्षण पासून वंचित राहत आहेत.हा धोका टाकण्यासाठी शासनाने online साठी लागणारे सर्व साहित्य पुरवावे. विद्यार्थ्यांना हे सर्व साहित्य खरीदी करण्यासाठी लाँकडाऊन असल्याने हाताला काम नसल्यांने त्यांच्या पालकांच्यकडे पैसे नाहीत.त्यामूळे online शिक्षणासाठी लागाणारी हि सर्व साधने शासनाने पुरविणे आवश्यक आहे.तरच ई-लर्नीग पध्दत यशस्वी होईल.अन्यथा ज्यांच्याकडे पैसा आहे व online शिक्षणासाठी लागणारी साधने आहेत त्याचीच मुले शिकतील व ज्यांच्याकडे ही साधने नाहीत ते विद्यार्थी या शिक्षक प्रक्रियेपासून वंचीत राहतील.त्यामूळे शासनाने योग्य तो व्यवहार्थ मार्ग काढावा व शिक्षण प्रक्रियेत सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना समावून घ्यावे.अन्यथा RPI(आ) च्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा RPI चे प.महा.अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे सर व कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष उत्तम कांबळे(दादा) यांनी दिला. यावेळी रुपाताई वायदंडे, संजय जिरगे, राजेंद्र टिपकूर्लीकर, अविनाश शिंदे,गुणवंत नागटिळे,संजय लोखंडे,राहूल कांबळे,किरण निकाळजे,प्रविण आजरेकर यांच्यासह RPI चे पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here