ठाण्यातील ऑनलाईन कशिनोच्या नावाने चालणारा जुगार बंद करा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे पोलिसांना निवेदन

thane-RPI

ठाणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रकाश कदम) : संपूर्ण ठाणे शहरात व प्रामुख्याने वागळे , लोकमान्यनगर बसडेपो जवळ, डवलेनगर ,सावरकरनगर,लोकमान्य नगर पाडा नंबर ४ गणपती मंदिर रोड, लोकमान्यनगर लाकडीपूल ,साठेनगर, शांतीनगर,किसननगर , रामनगर रोड नंबर २८,पडवळ नगर, कोपरी ,मनोरमानगर, व अश्या अनेक ठिकाणी छोट्याश्या गळ्यामध्ये ऑनलाईन कशिनोच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जुगारांचे अड्डे राजरोस पणे चालू आहे त्या ठिकाणी दररोज लखोंचा जुगार चालू आहेत.

जुगाराचा अड्डा चालवण्यासाठी कोणताही शासकीय परवाना मिळत नाही.या सर्व कशीनो चालक व त्यांना व्यवसाय करायला लावणारा डिलर यांच्यावर कडक कारवाई करून हे सर्व अड्डे कायमस्वरूपी बंद करून कशिनो चालकांवर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे वतीने ठाणे जिल्हा युवक महासचिव अशोक कांबळे यांनी केली

यावेळी त्यांच्यासोबत ठाणे जिल्हा संघटक सचिव मंगेश सदरे,ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष विनोद भालेराव,कार्यध्यक्ष प्रल्हादजी मगरे , ज्येष्ठ उपाध्यक्ष शहाजीराव दुपारगुडे , कार्याध्यक्ष युवक आघाडी विशाल ढेंगळे,बबन केदारी सर्व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त , सहाय्य्क उपयुक्त,वर्तकनगर पोलीस स्टेशन या सर्व ठिकाणी निवेदन दिले व यापुढे ही जुगारबंदी आंदोलन चालू ठेवणार असे सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

 

thane-rpi-nivedan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here