गोदावरी कॉलेज चौकात दोन जणांवर चाकूहल्ला करणाऱ्या तिघांना अटक

godavari-college-knief-attack

जळगाव (प्रतिनिधी शाहिद खान) : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी कॉलेज चौकात वाद मिटवित असतांना २ जणांना चाकूहल्ला केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील ३ जणांना एमआयडीसी पोलीसांनी आज (दि.११ ऑगस्ट) रोजी सकाळी अटक केली आहे. ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दिपक उर्फ दपत्या संजय साळुंखे, (वय-२३) रा. प्रजापती नगर जळगाव, शैलेश उर्फ गोलु शंकर चौधरी (वय-१९) रा. सम्राट कॉलनी जळगाव आणि गोलु भास्कर सोनार (वय-२३) रा. लक्ष्मी नगर तांबापुरा जळगाव, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी की गोदावरी कॉलेज चौकावरील माऊली साई टी सेंटर जवळ सुशील मनोज जाधव रा. सुधाकर नगर जळगाव व त्याच्या मित्र राकेश गोपाल पाटील यांच्यासोबत मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता उभे होते. त्यावेळी भरधाव दूचाकीने एका सायकलस्वाराला धडक दिली होती. यामुळे वाद निर्माण झाला होता. सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी राकेश पाटील सुशील जाधव आणि बाजूला उभा असलेल्या बेकरीवाला सुरेश पाटील यांनी मध्यस्थी केली असताना ५ जणांपैकी एकाने हातातील धारदार चाकू काढून राकेश पाटील यांच्या पोटावर तर बेकरीवाला सुमित पाटील यांच्या पाठीवर महाराणा करून दुखापत केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, सुधीर साळवे, सैय्यद इम्रान, किशोर पाटील, मुदस्सर काझी, छगन तायडे, सचीन पाटील, यांनी अटक केली आहे तिघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here