इंद्र मेघवाल याची शिक्षकाकडून निघृण हत्या झाल्याचा निषेध

bahujan-samjwadi-party-nandurbar

राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील सुराणा येथील घटना

नंदुरबार (प्रतिनिधी आकाश जावरे) : राजस्थान राज्यातील जालोर जिल्ल्यातील सुराणा येथील देवराम मेघवाल यांचा मुलगा इंद्र मेघवाल एका खाजगी शाळेत शिकत होता. शाळेत मुलाला जेव्हा तहान लागली व शाळेतील पाण्याच्या मटक्या मधुन पाणी प्यायला म्हणून तेव्हा शिक्षक छैलसिंह याने इंद्र मेघवाल यास बेदम मारहाण केली. या बेदम मारहाणीमुळे इंद्र मेघवाल याचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला. या अमानवीय हत्येमुळे बहुजन समाज संतापलेला आहे. त्यामुळे या बालकाच्या नातेवाईकाना न्याय मिळाला पाहीजे, अशी मागणी बहुजन समाज पार्टी मार्फत निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

 

nandurbar-collector-officeया निवेदनात या खटल्याची फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालविण्यात यावा आणि आरोपीस कठोर शासन करण्यात यावे. पिडीतास ५१ लाखाची मदत तसेच कुटुंबातील एका सदस्यास सरकारी खात्यात नोकरी देण्यात यावी. तसेच मेघवाल परिवार भयग्रस्त झाला असून त्यास संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तसेच नंदुरबार जिल्ह्यात बहुजन समाज पार्टीतर्फे तीव्र आदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

बहुजन समाज पार्टी मार्फत निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देताना नंदुरबार जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे, नंदुरबार जिल्ह्यातील कट्टर सामाजिक कार्यकर्ते आकाशभाऊ जावरे, जिल्हा प्रभारी जितेंद्रभाऊ तायडे ,जिल्हा प्रभारी मनोज वसईकर साहेब, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमीलाबाई (मिनाबाई) जाधव,जिल्हा सचिव विश्वास पवार, जिल्हा उपाध्यक्ष संतोष अहिरे, राजेंद्र महाले, संतोष पवार, सुभाष बिरारे, अविनाश वाघ, दिपक महीरे, सुभाष महीरे, फिरोज धोबी, किरण अनिल शिरसाट, चंद्रकला मोरे, ज्योती अशोक नगराळे, सना शाह, फरजाना शेख, रुबीना धोबी, अनीसा समीर सिकलिकर व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here