बिपाशा बासू होणार आई, ग्लॅमरस फोटो शेअर करत दिली चाहत्यांना बातमी

bipasha-basu-share-pregancy-news

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनंतर आता बॉलिवूडमधील आणखी एक कपल लवकरच आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर यांच्याकडे नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. बिपाशाने गरोदरपणातील फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याचं सांगितलं आहे.

बिपाशाने पती करणबरोबर खास फोटोशूट केलं आहे. दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करत ग्लॅमरस फोटोशूट करत चाहत्यांना गोड बातमी दिली. या फोटोमध्ये बिपाशा गरोदर असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. तसेच तिचं बेबी बम्पही पाहायला मिळत आहे. बिपाशाने फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

https://www.instagram.com/p/ChT3SgaNdJF/?utm_source=ig_web_copy_link

बिपाशाने हे सुंदर फोटो शेअर करताच चाहत्यांसह कलाविश्वातील अनेक मंडळींनी या सेलिब्रिटी कपलला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. बिपाशा-करणने आपण आई-बाबा होणार हे जाहिर करताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद देखील दिसून येत आहे. शिवाय बिपाशाचा प्रेग्नेंसी ग्लो विशेष लक्षवेधी आहे. एकूणच काय तर बिपाशा-करणच्या आयुष्याची आता नवी सुरुवात झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here