मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : महाराष्ट्राची हास्यजत्रा मालिकेतील कलाकार शिवाली परबच्या मोबाईलची चोरी झाली आहे. शिवालीचा ‘आयफोन १३’ हा मोबाईल दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेल्याचा प्रकार रविवारी घडला. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
कल्याणमध्ये राहणारी शिवाली परबने रविवारी सकाळी मिरारोडला जाण्यासाठी ॲानलाईन रिक्षा बुक केली होती. तिची रिक्षा भिवंडीतील पिंपळास फाटा येथे आल्यावर मागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी शिवालीच्या हातातील मोबाईल हिसकावला.
मोबाईल हिसकावल्यानंतर दोघेही चोर दुचाकीवरून पळून गेले. यानंतर शिवालीने कोनगाव पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीबाबत तक्रार दाखल केली. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







