बुलढाण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाच तलवारी जप्त; तिघे अटकेत

बुलढाणा (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बुलढाण्याहून ऑटोमध्ये अजिंठा रोडकडे पाच तलवारी घेऊन जात असताना तीन जणांना अटक केली आहे. शेख परवेज शेख शकील, सैय्यद समीर सैय्यद युसुफ आणि सैय्यद साकिब सैय्यद अलिम अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. यांच्याकडून पाच तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

 

बुलढाणा येथून अजिंठाकडे जात असलेल्या ऑटो (क्रमांक एमएच २८ टी १४६०) हॉटेलजवळ थांबवून कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या आरोपींकडून ५ तलवारी आणि १ ऑटो व २ मोबाईल असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

आरोपींविरोधात विश्रामबाग बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून ही मोठी कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here