जम्मू (ऑल इंडिया उपसंपादक राजन चौधरी) : काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये लष्कराने दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. तर, मंगळवारी सोपोर पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.
सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत सोपोर पोलिसांनी मंगळवारी लष्कर-ए-तय्यबाच्या एक हायब्रीड दहशतवाद्याला आणि एका ओजीडब्ल्यूला अटक केली. सुरक्षा दलांनी त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे.
J&K | Sopore Police, along with security forces arrested one hybrid LeT terrorist and one OGW today; arms and ammunition recovered. Case registered and investigation is undergoing. pic.twitter.com/E0LEhl7P1M
— ANI (@ANI) August 23, 2022
अटक करण्यात आलेल्या हायब्रीड दहशतवादी आणि ओजीडब्ल्यूची चौकशी करण्यात येत आहे. तसेच, त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेच्या नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावला. यावेळी पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आले. २२-२३ ऑगस्टच्या मध्यरात्री दहशतवाद्यांनी नौशेरा सेक्टरमध्ये एलओसीजवळ घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यादरम्यान तैनात भारतीय जवानांनी ही घुसखोरी हाणून पाडली.







