जळगाव (प्रतिनिधी) : येथील बळीराम पेठेतील राहिवासी असलेल्या व सरस्वती भुवन प्रशाला गोंदेगाव येथील शिक्षिका सौ.वर्षा दाबके – नांदेडकर यांचे काल (दि.२४) दुपारी १२.५० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
सरस्वती भुवन प्रशाला गोंदेगाव यांच्या विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ.वर्षा दाबके – नांदेडकर ह्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून प्रसिध्द होत्या. आपल्या विद्यार्थ्यांवर पुत्रवत प्रेम करणारी शिक्षिका व आपल्या मनमिळावू स्वभावाने सर्वांनाच आपलेसे करणाऱ्या सौ.वर्षा यांच्या निधनाने सरस्वती भुवन प्रशालेतील सर्वच शिक्षक व आप्तस्वकीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात सासू, आई, पती, १ मुलगा, भाऊ असा परिवार आहे. त्या क्षयरोग विभागातील पर्यवेक्षक दिपक पांडुरंग नांदेडकर (शुक्ल) यांच्या पत्नी होत. दाबके, नांदेडकर व शुक्ल परिवाराला या दुःखातून सावरण्याचे परमेश्वर बळ देवो. बुलंद पोलीस टाइम्सतर्फे सौ.वर्षा दाबके – नांदेडकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली !







