हिंदी भाषा पखवाडानिमित्त स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात व्याख्यान

swami-vivekananda-college

जळगाव (प्रतिनिधी) : येथील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने हिंदी भाषा दिनापासून हिंदी भाषा पखवाडा घोषित करण्यात आला आहे. या सप्ताहातंर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

mj-collegeआज हिंदी भाषा पखवाडा सप्ताहाच्या
अंतर्गत विद्यार्थ्यांकरिता हिंदी भाषा
एवंम रोजगार की संभावना या विषयावर
व्याख्याने आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला व्याख्याता म्हणून बँक ऑफ
बडोदाच्या राजभाषा अधिकारी सुश्री
सुकन्यादेवी ह्या होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
उपप्राचार्या करुणा सपकाळे ह्या होत्या.

 

कार्यक्रमाला ऑपरेशन डिपार्टमेंटच्या व्यवस्थापक आशा पांडे, क्रेडीट विभागाचे व्यवस्थापक दिपक टोंगे, महाविद्यालय सन्मवयक सौ.बऱ्हाटे, उमेश पाटील, प्रसाद देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रा.ज्योती मोरे यांनी केले. व्याख्यानाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

 

hindi-pakhwada

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here