केसीईच्या वर्धापनदिनानिमित्त झांबरे विद्यालयात नाट्यछटा स्पर्धा संपन्न

natyachata-spardha

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – येथील केसीई सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय व ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

hirkani-natyachata
हिरकणीवर नाट्यछटा सादर करताना संस्कृती पवनीकर

या स्पर्धेत विविध शाळांमधील स्पर्धकांनी मोठ्या उत्साहात
सहभाग घेतला होता. केसीई सोसायटीचे प्रशासकीय
अधिकारी शशिकांत वडोदकर यांच्या हस्ते गणरायाची
पूजा करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.मी जिजाऊ
बोलतेय , मी भारतमाता बोलतेय , मला मोठं व्हायचंय,
शेतकरी आत्महत्या , झाडांची आत्मकथा , स्वप्नांची परी ,
बोलकी , बाबा मी बोलतोय , डॉ.आनंदीबाई जोशी ,
हिरकणी , माझं पाठांतर , सत्यनारायण ,माझी ट्युशन
अशा विविध सामाजिक विषयांवर सुंदर अशा नाट्यछटा
यावेळी सादर करण्यात आल्या.सदर स्पर्धा ही तीन
गटामध्ये घेण्यात आली.

 

 

स्पर्धेतील पहिल्या गटात प्रथम नताशा पवार – ( प्रथम )गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय जळगाव), द्वितीय शाश्वत कुलकर्णी (गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय जळगाव), तृतीय आर्या वाघ – (डॉ.अविनाश आचार्य विद्यालय), उत्तेजनार्थ प्रथम हंसिका पाटील (उज्ज्वल इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ द्वितीय समृद्धी भास्कर (बालनिकेतन विद्यामंदिर).

 

दुसऱ्या गटात प्रथम संस्कृती पवनीकर (प.न.लुंकड कन्या शाळा), द्वितीय केतकी कोरे (प.न.लुंकड कन्या शाळा), तृतीय भूमिका कापडणीस (नंदिनीबाई वामराव मुलींचे विद्यालय), उत्तेजनार्थ प्रथम सिद्धी धांडे (ओरिओन सीबीएसई स्कुल), उत्तेजनार्थ द्वितीय शर्वा जोशी (प.न.लुंकड कन्या शाळा)

 

तिसऱ्या गटात प्रथम कृतिका कोरे (प.न.लुंकड कन्या शाळा), द्वितीय श्रुती पाटील (नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय), तृतीय उपलक्ष्य पाटील (नवीन माध्य.विद्यालय), उत्तेजनार्थ प्रथम नम्रता पाटील (नंदिनीबाई वामनराव विद्यालय), उत्तेजनार्थ द्वितीय आचल रणजीतसिंग (ओरिओन सीबीएसई स्कुल) या विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावलीत.

 

hemant-patilसर्व स्पर्धकांना संस्थेचे शैक्षणिक सल्लागार डॉ. योगेश खडके तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध कलावंत व मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख हेमंत पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. डॉ.योगेश खडके यांनी प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रयोगसिध्द कला व शैक्षणिक जीवनातील यश याविषयी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे परीक्षण कलादर्श स्मृतिचिन्हचे संचालक व नाट्यकलावंत सचिन चौघुले तसेच मृदंग इंडिया असोसिएशनचे आर्ट डिपार्टमेंट हेड व नाट्यकलावंत योगेश शुक्ल यांनी केले.

 

याप्रसंगी शाळेचे शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी , मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, मुख्याध्यापिका रेखा पाटील आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजन व नियोजनाकरिता उपशिक्षक योगेश भालेराव, चंद्रकांत कोळी यांच्यासह सूर्यकांत पाटील , तडवी सर कलाशिक्षक सतिश भोळे, सुचिता शिरसाठे, धिरज चौधरी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतलेत.

natyachata jijau-natyachata

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here