जळगाव (संपादक सुनिल पाटील) : सर्वांना सोबत घेऊन चालणारे व इतरांच्याही विकासासाठी झटणारे कुऱ्हे पानाचे गावातील एक युवा नेतृत्व गिरिश संजय पवार यांचे सामाजिक व विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. विविध उपक्रम राबवून ते नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. त्यामुळे समाजातील विविध घटनांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष लाभ मिळतोय. हे कार्य व योगदान लक्षात घेता गगनझेप ऊर्जा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा मराठा सेवा संघाचे जिल्हा सहसचिव गिरीश संजय पवार यांचा राजनंदनी बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे.
जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत भवनाच्या सभागृहात रविवार दि. १८ रोजी आयोजित कार्यक्रमात डॉ केतकी पाटील यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी आमदार सुरेश भोळे, आमदार दिलीप वाघ, माजी महापौर सुनील भंगाळे, सेवानिवृत्त उपनिरीक्षक सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्रमंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक, सामाजिक संघटना, अधिकारी वर्ग यांच्याकडून त्यांचे कौतुक व शुभेच्छा देण्यात येत आहेत.







