अलवर (राजस्थान) : जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आधी बलात्कार केला आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत हजारो रुपये उकळले. पोलिसांनी पॉस्को कायद्यासह अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल नावाच्या आरोपींने अल्पवयीन मुलीचा एक खासगी फोटो मिळवला होता. हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपींनी पीडितेला भेटायला बोलावले. ३१ डिसेंबर २०२१ रोजी पीडिता घटनास्थळी पोहोचल्यावर साहिलने अरबाज, जावेद, तालिम, अक्रम, सलमान, मुस्तकिम व अन्य एकासह मिळून पीडितेवर सामूहिक बलात्कार केला.
आरोपींनी पीडितेवरील अत्याचाराचा व्हिडीओही काढला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ३ जानेवारी आणि ६ जानेवारी रोजी पुन्हा एकदा पीडितेवर बलात्कार केला. तसेच तिच्याकडून ५० हजार रुपयांची खंडणीही वसूल केली.