बाळासाहेबांची शिवसेना शाखा क्र. १०६ च्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर

shivsena-netra-tapasani

मुंबई (उपसंपादक ॲड.चंद्रशेखर आठल्ये) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने व शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना शाखा क्र. १०६ च्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

mulund-shivsenaयावेळी मुलूंड पुर्व उपविभागप्रमुख अभिजीत
कदम व शाखाप्रमुख विनोद गायकवाड यांनी
दि. ४ डिसेंबर रोजी सुप्रसिध्द नेत्रतज्ञ
डॉ.राकेश शाह यांच्या स्वराशी नेत्रालयाच्या
माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात
आले होते. या शिबिराचा मुलूंड व परिसरातील
शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.

 

या शिबिराला विभागप्रमुख अशोक पाटील, उपनेते आनंद जाधव, मुलूंड विधानसभा प्रमुख जगदीश शेट्टी, विधानसभा संघटक मनोज हिरवे, विधानसभा कार्यालय प्रमुख बापू भिताडे, उपविभाग संघटक प्रतिमा देडीया, शाखा संघटिका स्नेहल कांबळे, वैशाली शिंदे, उपसंघटिका सविता सालप, दिपाली ओव्हाळ, कार्यालय प्रमुख अमोल प्रधान, उपशाखाप्रमुख श्याम नागलगे, भवरलाल गेहलोत, चेतन बोलके, सचिन कदम तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

 

shivsena-shakha-106 netra-tapasani

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here