गोंदिया (प्रतिनिधी) : खासगी वाहनाने कारवाई करून परतणाऱ्या गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस गोंदिया शहराजवळील ढीमर टोली येथे पहाटे ४ वाजेच्या दरम्यान अपघात झाला आहे. उभ्या ट्रकला मागून धडक दिल्याने यात एक पोलिस कर्मचाऱ्याच्या जागीच मृत्यू झाला आहे. तर २ पोलीस कर्मचारी अति गंभीर जखमी झाले आहेत.
एका खासगी वाहनाने कारवाई करून परताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस वाहनाला गोंदिया शहराजवळील ढीमर टोली येथे भीषण अपघात झाला आहे. उभ्या असलेल्या ट्रकला मागून धड़क दिल्याने एक पोलिस कर्मचाऱ्याच्या जागीच मृत्यू झाला आहे, तर २ पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात येत आले आहे.
मृतक पोलिस कर्मचाऱ्याचे मानकर असून अति गंभीर व्यक्तीचे नाव लुटे व कापगते असे आहे. गंभीर जखमी व्यक्तीला गोंदियातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जखमी ना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविन्यात येत आले आहे. धड़क इतकी जबर होती की, पोलीस वाहनाचा चेंदामेंदा झाला आहे. रात्रभर कारवाई करून परत येत असताना झोपीची डुलकी लागल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.







