पारोळा पोलिसांनी अवैध दारू विक्रेते,दारू भट्टीवालेवर केली धडक कारवाई

parola-police

पारोळा (प्रतिनिधी) : येथे पोलिसांनी गावठी दारूविक्रेते ,देशी दारू विक्रेते व दारू भट्टी वाल्यावर गेल्या १८ दिवसात २५ छापे टाकून १,७८,२६५ रुपयांचा मुद्देमाल वर केली धडक कारवाई व २५ आरोपीवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली,त्यामुळे दारू विक्री करणारांचे धाबे दणाणून गेले आहेत.

 

desi-liquorगावठी दारू भट्टीवाले शांताराम चैत्राम पारधी शेवाळे खु यांचे दारू वर छ्यापा टाकून ५६०००/-रुपयांचा मुद्देमाल नाश केला तसेच अण्णा धर्मा वडर टिटवी यांची व सतीश आनंदा भिल पारोळा यांची दारुभट्टी नाश करून -८२२००/-रुपयांचा मुद्देमाल नाश केला तसेच पारोळा,तरडी येथील ५ देशी दारू विक्रेते, राजवड,दळवेल,मराठखेडा, सारवें, भिलाली,पारोळा,रत्नपिंप्री, जोगलखेडा,शेवाळे खुर्द,टिटवी,बहादरपूर,महालपूर येथील – १७ अवैध गावठी दारू विक्रेते यांचेवर छ्यापे टाकून एकूण २५ छ्यापे टाकून एकूण २५ आरोपीवर गुन्हये दाखल करून एकूण १,७८,२६५ रुपयांचा मुद्देमाल नाश करून धडक कारवाई कारवाई करण्यात आली आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, ॲडशिनल एस.पी. रमेश चोपडे, चाळीसगाव, डीवायएसपी राकेश जाधव, Parola-police-took-action-against-the-illegal-liquor-seller,-Daru-Bhattiwaleअमळनेर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, एपीआय निलेश गायकवाड, एपीआय रवींद्र बागुल, पीएसआय राजू जाधव, पीएसआय शेखर डोमाळे, एएसआय बापू पाटील, एएसआय जयवंत पाटील, एएसआय इकबाल शेख, हेकॉ सुधीर चौधरी, हेकॉ नाना पवार, हेकॉ किशोर पाटील, हेकॉ विजय भोई, पोना संदीप सातपुते, पोना प्रवीण पाटील, पोना प्रवीण पारधी, पोना प्रदीप पाटील,पोना योगेश जाधव, पोना ज्ञानेश्वर सपकाळे, पोकॉ किशोर पाटील, पोकॉ राहुल कोळी, पोकॉ हेमचंद्र साबे, पोकॉ राहुल पाटील, पोकॉ आशिष गायकवाड, पोकॉ अभिजीत पाटील, पोकॉ नरेंद्र पाटील, पोकॉ निकम , पोकॉ दुसाने यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here