पुणे ( संपादक सुनिल पाटील) : मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड राष्ट्रीय सरचिटणीस उद्योजक विजयराव कदम राष्ट्रीय सचिव संजयराव साळवी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद महापदी यांच्या सुचनेनुसार मंगळवार दिनांक १३/१२/२०२२ रोजी सर्व हिंदू धर्मीय संघटना विरोधी पक्षातर्फे तसेच व्यापारी व शिवप्रेमी यांनी पुकारलेल्या पुणे कडकडीत बंदला पुणे जिल्हा अध्यक्ष कृष्णाजीराव साळवी यांनी पाठींबा जाहीर केला
या वेळी बोलताना राज्य महीला प्रदेशाध्यक्षा प्रा सौ संध्या सचिन राणे यांनी सांगितले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व देशाची अस्मिता आहे सातत्याने काही राजकारणी हे सध्या जाणुन बुजुन युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल खोटी बेजबाबदार वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी जर हे हेतुपूर्वक करत असतील तर हे प्रकार या पुढे खपवून घेतले जाणार नाहीत मग ती व्यक्ती कोणत्याही राजकिय पक्षाची असो वा कितीही मोठ्या पदावरील असो हे कोणीही महाराष्ट्रीय देशभक्त सहन करणार नाही उद्याच्या पुणे बंदला सर्वांचा प्रतिसाद लाभणार आहे त्याला आमचा पाठिंबा आहे .







