‘साहेब’ या दिनदर्शिकेचे मुंबइत अजितदादा पवार यांचे हस्ते प्रकाशन संपन्न

साहेबदिनदर्शिका

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे वाढदिवसचे निमित्ताने येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यालयीन सचिव संजय चव्हाण यांनी निर्मित केलेल्या ‘साहेब’ या सन २०२३च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. अजितदादा पवार यांचे हस्ते आज मुंबईत पार पडले.

 

यावेळी संजय चव्हाण, राजेश पाटील, दिलीप चव्हाण, रमेश पाटील, हेमंत पाटील उमेश पाटील आदी उपस्थित होते.
श्री शरद पवार यांचे वाढदिवसाचे निमित्ताने त्यांच्या कार्यावरील वेगवेगळे विषय घेऊन श्री. चव्हाण दरवर्षी दिनदर्शिका प्रसिद्ध करीत असतात.

 

राज्यात ही दिनदर्शिका चर्चेचा विषय ठरतो. यंदाच्या दिनदर्शिकेत राज्यातील सामाजिक क्षेत्रात आघाडीची संस्था असलेल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानविषयी माहिती देण्यात आली आहे. श्री. अजित पवार यांनी यावेळी श्री. चव्हाण यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here