दापोली (प्रतिनिधी) : तालुक्यातील उन्हवरे येथील बाजारपेठेत हॉटेलच्या बाहेर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे चोरीस गेल्याची घटना घडली आहे. ही घटना २६ डिसेंबर रात्री ८ ते २७ डिसेंबर सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची फिर्याद प्राची संदेश पवार (२६, उन्हवरे, तळवटकरवाडी, दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राची पवार यांचे बाजारपेठेत मणियार किराणा मालाचे दुकान व खापरे हॉटेल आहे.
या हॉटेलच्या वरच्या बाजूला बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे अज्ञाताने २६ ते २७ डिसेंबरच्या दरम्यान चोरुन नेले. याबाबतची फिर्याद प्राची यांनी पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर अज्ञात चोरट्यांवर भादंविकलम ३७९, ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.







