सरत्या वर्षसंध्येला मुंबईत कलम १४४ लागू

31-st-in-mumbai

मुंबई (उपसंपादक दिलीप वळवी) : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची सुरुवात अतिशय जल्लोषात आणि दिमाखात करण्यासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत. अनेकांनी पर्यटनस्थळांवर गर्दी केली आहे, तर काहींनी मुंबईत येत या शहरातूनच २०२२ या वर्षाला निरोप देण्याचं ठरवलं आहे. तुम्हीही थर्टीफर्स्ट म्हणजेच ३१ डिसेंबर २०२२ ला मुंबईत असाल, तर काही नियमांचं पालन मात्र नक्की करा. कारण, मुंबई पोलिसांकडून शहरात कलम लागू करण्यात आलं आहे. त्यामुळं आता थर्टीफर्स्ट कसा साजरा करायचा असाच प्रश्न या शहरातील नागरिकांना पडू लागला आहे.

 

मुंबई पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार ३१ डिसेंबर २०२२ ते २९ जानेवारी २०२३ पर्यंत हे नियम लागू असणार आहेत. यामध्ये प्रामुख्यानं फ्लाईंग कंदिल वापरणं, विक्री करणं आणि ते सोबत बाळगणं या मानवी जीवनाला धोका उदभवू शकतो. किंबहुना शहरातील शांतता आणि सुव्यवस्थाही भंग होऊ शकते ज्यामुळं सावधगिरी बाळगत कलम १४४ मधील अधिकारान्वये त्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

चीनमध्ये आलेल्या संकटाचे पडसाद आता महाराष्ट्र आणि मुंबईतही उमटू लागले आहेत. वर्षाच्या अखेरच्या दिवशी मुंबईत बरीच गर्दी होते, त्यातच कोरोनाचा संसर्ग फोफावण्याची भीती असल्यामुळं शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदीच्या आदेशांनुसार मुंबईत कोणत्याही मोकळ्या किंवा बंद ठिकाणावर पार्टी करण्यास मनाई असेल. यामध्ये रेस्तराँ, हॉटेल, बार, रिसॉर्ट यांचा समावेश आहे. सदरील नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १४४ अन्वये कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here