कोरोना योद्धात निस्वार्थ कार्य करणाऱ्या प्रशांत पाटील यांचा पत्रकारांनी केला सत्कार
चोपडा (प्रतिनिधी रविद्र कोळी) : येथील विश्रामगृह येथे बाळशास्त्री जांभेकर व पत्रकार दिनानिमित्त दिनांक ०६ जानेवारी २०२३ रोजी ठीक १.३०वाजेला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेमला माल्यर्पण करून पूजन करण्यात आले व सर्व पत्रकार बांधवांतर्फे मानवंदना करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे पहिले मराठी वृत्तपञसृष्टीचे जनक आद्य पञकार बाळशास्त्री जांभेकर यानी पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लेखणीच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ज्या पद्धतीने तळमळीने प्रयत्न केले त्याचप्रमाणे आजच्या युगात देखील आपण पत्रकारिता करीत असताना जनसामान्याला न्याय कशा पद्धतीने मिळेल व जनहित कशा पद्धतीने होईल सर्वसामान्य जनतेचा आवाज कसा शासनापर्यंत पोहोचेल असा प्रयत्न करावा असे मेकर टाइम्स चोपडा तालुका प्रतिनिधी रविंद्र कोळी आपल्या प्रतिपादनात पत्रकारांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे पत्रकारांतर्फे व स्वराज्य पोलीस मित्र व माहिती अधिकार संघटना चोपडा यांच्यातर्फे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले श्री कक्ष, पुरुष कक्ष, अपघात क्षेत्र, या ठिकाणी कार्यरत असलेले नर्स, कर्मचारी वर्ग येथे 65 रुग्ण व कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आले.
कोरोना काळात कोणीही कोणाच्या जवळ येत नव्हते व जवळ आले तरी अतंर ठेऊन तोडाला मास्क लावल्याशिवाय जवळ येत नव्हते त्या कोरोना काळात प्रदीर्घ सेवा बजावून जनसेवा करीत असताना आपल्या जीवाची कुटुंबाची कोणतीही पर्वा न करता जनसेवा हीच माझी खरी सेवा कोरोना काळात मयत झालेल्या रुग्णांचे शव स्वतः ॲम्बुलन्स मध्ये टाकून अंत्यविधीदेखील प्रशांत पाटील उर्फ मामु यांनी केले त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण. आणि माहिती अधिकार संघटना, च्या वतीने कोरोना योद्धा म्हणून प्रशांत पाटील उर्फ मामू यांच्या सत्कार मेकर टाईम प्रतिनिधीच्या वतीने त्यांच्या सत्कार देखील करण्यात आला. रुग्णालयातील इतर उपस्थित कर्मचारी यांचा देखील सत्कार करण्यात आला व त्यानंतर त्यांना फळ वाटप करण्यात आले यावेळी. हेमकांत गायकवाड, विनायक पाटील, सुनील पावरा रवींद्र कोळी, मन्सूर तडवी, समाधान कोळी, मिलिंद वाणी, शशिकांत व इतर सामाजिक कार्यकर्ते बाळू कोळी समाधान बाविस्कर उपस्थित होते..







