मुंबई (उपसंपादक ॲड. चंद्रशेखर आठल्ये) : मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे प्रतिवर्षी समाजाच्या विविध क्षेत्रातील आपल्या योगदानातून समाज जीवन संपन्न करणाऱ्या मानवतांचा विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येतो
यंदाच्या संस्थेच्या २२ व्या वर्धापन दिन व पुरस्कार वितरण समारंभ मध्ये डॉक्टर पौर्णिमा एकनाथ सुर्वे, (बीए, एल एल एम पर्यावरण कायदा, पीएचडी कायदा ,डी एल एल अँड एल डब्ल्यू ,पी जी डी एच आर, पी जी डी सी एल ,पी जी डी आय पी आर व एमबीए स्कॉलर )यांना शिक्षक रत्न पुरस्कार २०२३ याच्यासाठी निवड करण्यात आली व शुक्रवारी दिनांक 6 जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी चार वाजता मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय डॉक्टर सुरेंद्र गावस्कर सभागृह या इथे हा सोहळा पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून संजय केळकर कार्यसम्राट आमदार ठाणे आणि सुकृत खांडेकर ज्येष्ठ पत्रकार संपादक दैनिक प्रहार यांचीही उपस्थित कार्यक्रमाला लाभली होती.
डॉक्टर पौर्णिमा एकनाथ सुर्वे या कायद्याच्या प्राध्यापक असून डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ लॉ नेरूळ येथे त्या कार्यरत आहेत व यशस्वीपणे त्यांच्या काम संभाळत आहेत.







