पुण्यात बारावीच्या विद्यार्थिनीची कालव्यामध्ये उडी

पुणे (जिल्हा प्रतिनिधी सुहास गायकवाड) : येथील पी जोग शाळेत बारावी मध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीने कालव्यामध्ये उडी मारल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. रात्री उशीरापर्यंत या मुलीचा शोध सुरू होता. श्रावणी नितीन वानखेडे असे उडी मारलेल्या मुलीचे नाव आहे.

 

संबंधित विद्यार्थिनी माणिक बागेतील पी जोग शाळेत १२ वीमध्ये शिक्षण घेते. तिची सोमवारी तिच्या कॉलेजमध्ये पुर्व परिक्षा होती. त्यासाठी ती कॉलेजला आली असता पेपर अर्धवट सोडून ती बाहेर आली होती. यानंतर मोबाईलवर बोलत तिने कॉलेज पासून जवळ असलेल्या कालव्यामध्ये उडी मारली.

 

तिला पाण्यात उडी मारताना व वाहून जाताना दोन तरूणांनी पाहिल्यानंतर पोलिसांना आणि अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. रात्री उशीरापर्यंत शोध सुरू होता. परंतु ती सापडली नसल्याचे सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here