संजय राऊत यांच्या जामीनाविरोधातील ईडीच्या याचिकेवर १८ जानेवारीला सुनावणी

sanjay-raut-in-ed-custody

मुंबई (प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : खासदार संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला होता. या विरोधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुनावणी होऊन शकल्याने आज पुन्हा संजय राऊत यांच्या विरोधातील याचिकावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी याकरिता मागणी करण्याकरिता आली आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या विरोधातील याचिकेवर १८ जानेवारी रोजी न्यायमूर्ती नितीन बोरकर यांचे खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

 

संजय राऊत यांच्या विरोधात ईडीने गोरेगाव येथील पत्राचा पुनर्वसन प्रकल्पात घोटाळा केल्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. संजय राऊत हे १०० दिवस आर्थर रोड कारागृहात होते. त्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला होता तसेच न्यायमूर्ती एमजी देशपांडे यांनी ईडीवर गंभीर निरीक्षण नोंदवले होते त्यामुळे ईडीने संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यात यावा याकरिता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

 

संजय राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना जामीन मंजूर करताना विशेष न्यायालयाने नोंदवलेल्या काही निरीक्षणांवर आणि टिप्पण्यावर ईडीने आक्षेप घेतला आहे. न्यायालयाची निरिक्षणे अनावश्यक आणि अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहेत. त्यामुळे त्या आदेशातून काढून टाकून नवा आदेश द्यावा अशी मागणी ईडीने केली आहे. राऊत यांचा पत्राचाळ पुर्नवसन प्रकल्प आर्थिक गैरव्यवहारात सक्रिय सहभाग होता. हे दर्शवणारे पुरावे सादर करूनही विशेष न्यायालयाने ते विचारात घेतलेले नाहीत. त्यामुळे राऊतांना जामीन मंजूर करण्याचा निर्णय रद्द करावा आणि त्यांना पुन्हा कोठडीत पाठवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी ईडीने याचिकेतून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here