- राज्य निवडणूक आयोगाच्या राज्यस्तरीय ,लोकगीत जागर स्पर्धेत शाहीर शिवाजीराव पाटील यांना द्वितीय व शाहीर विनोद ढगे यांचा तृतीय क्रमांकाने सन्मान
- दिनांक २५ जानेवारी रोजी मुंबई येथे सन्मानाचे आयोजन
जळगाव (संपादक सुनिल पाटील) : महाराष्ट्र शासनाच्या मुख्य निवडणूक आयोग मुंबई तर्फे सन २०२२ मध्ये घेतलेल्या लोकशाहीतून लोकगीतांचा जागर या समूह गीत गायन स्पर्धेमध्ये खानदेशातील नगरदेवळा तालुका पाचोरा येथील लोकरंग फाउंडेशनचे अध्यक्ष शाहीर शिवाजीराव पाटील यांचा मराठी गीताचा दुसरा क्रमांक आला असून खानदेश लोक कलावंत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहीर विनोद ढगे यांना तृतीय क्रमांकाचा सन्मान मिळालेला आहे,
महाराष्ट्र शासनाच्या मुख्य निवडणूक आयोगातर्फे राज्यभरात मतदारांमध्ये जी उदासीनता दिसून येते ती उदासीनता दूर व्हावी या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाने सन २०२२ मध्ये लोककलावंतांना लोकगीतातून लोकशाहीचा जागर हा विषय दिलेला होता यामध्ये असंख्य प्रवेशिका राज्यभरातून निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या त्यात प्रथम क्रमांक जालना येथील शाहीर नानाभाऊ परिहार यांना प्रथम क्रमांकाचे रुपये २१,०००, सन्मानचिन्ह शाल श्रीफळ असे बक्षीस प्राप्त झाले आहे तसेच द्वितीय क्रमांकाचे बक्षीस खानदेशातील नगरदेवळा येथील शाहीर शिवाजीराव पाटील यांना जाहीर झाले असून रुपये ११,०००, शाल श्रीफळ सलमानचिन्ह व तृतीय क्रमांकाचे समूह गटातील तिसरे बक्षीस जळगाव येथील शाहीर विनोद ढगे रुपये ५०००, शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक आयोगातर्फे हा कार्यक्रम दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी मुंबई येथे राज्य निवडणूक आयुक्त व मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत चर्चगेट जवळ असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय निवडणूक दिनानिमित्त सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सन्मान संपन्न होणार आहे.







