मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित होणार महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा

maharashtra-gaurav-award

मुंबई (उपसंपादक ॲड.चंद्रशेखर आठल्ये) : अमरदीप वृत्तपत्रातर्फे महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

 

पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, पुरस्कार प्रदान करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या अँटी करप्शन कमिटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय संघटक सचिव देवांग शेठ, अँटी करप्शन कमिटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव आर्थिक संरक्षण अनिल पावसकर आदींची उपस्थिती राहणार आहे.

 

कार्यक्रम सेठीया हॉल, रघुलीला मॉल, कांदीवली पश्चिम येथे ठेवण्यात आलेला आहे तरी नागरिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here